Posts

फळांची बॅगिंग का करावी-पक्ष्याद्वारे फळ खाल्ले जाते व बुरशी, माशा आणि किडे यामुळे पूर्ण फळाचा नाश होतो व फळ वाया जाते जर फळा ला कव्हर (बॅगिंग) केले तर होणारे नुकसान आपण कमी करू शकतो....

Image
फळांची बॅगिंग का करावी-पक्ष्याद्वारे फळ खाल्ले जाते व बुरशी, माशा आणि किडे यामुळे पूर्ण फळाचा नाश होतो व फळ वाया जाते जर फळा ला कव्हर (बॅगिंग) केले तर होणारे नुकसान आपण कमी करू शकतो.... फळ आणि भाज्या यांची बॅगिंग कशा पद्धतीने करतात व त्यासाठी कोणते यंत्र उपयुक्त ठरू शकतात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दि.19 जुलै 2022 रोजी होट्टल येथे संस्कृती संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी अंतर्गत फळांच्या बॅगिंग विषयी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदरील कार्यक्रमांतर्गत डॉ. प्रियंका खोले यांनी फळ आणि भाज्याची बॅगिंग कारणे का जरुरी आहे व बॅगिंग कशा पद्धतीने करावी व त्यासाठी कोणत्या प्रकारच्या यंत्राचा उपयोग करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. बॅगिंग ही कोण कोणत्या फळांची केली जाते- पेरू, आंबा, चिकू, पपई, कारले, भोपळा इत्यादी साठी बॅगिंग केली जाते. बॅगिंग का करावी-पक्ष्याद्वारे फळ खाल्ले जाते त्यामुळे पूर्ण फळाचा नाश होतो व फळ वायाला जाते जर फळा ला कव्हर केले तर तो तोटा आपण कमी करू शकतो. बॅगिंग मुळे फळांचे ऊन पाऊस वाऱ्यापासून संरक्षण होते तसेच खार, बुरशी, माश...

हिमोग्लोबिन तसेच कॅल्शियम वाढी साठी शेवगा पानांच्या पावडर चा प्रयोग..

Image
  हिमोग्लोबिन तसेच कॅल्शियम वाढी साठी शेवगा पानांच्या पावडर चा प्रयोग.. महिलांमध्ये हिमोग्लोबिन तसेच कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी, हाडांचा ठिसूळपणा, अशक्तपणा, चक्कर येणे अशा अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. यासाठी महिलांमधील हिमोग्लोबिन व रक्तातील इतर घटक तपासून त्यावर आहार मार्गदर्शन आणि उपचार करण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या गृह विज्ञान विभाग, नाबार्ड अंतर्गत पाणलोट विकास प्रकल्प आणि नागरी सहकारी दवाखाना होट्टल यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जुन रोजी रक्त तपासणी शिबिर आयोजित केले गेले. यामध्ये तपासलेल्या रक्तांचे अहवाल आज दिनांक 19 जुलै २०२२ रोजी महिलांना देण्यात आले. शेवग्याची पाने लोह आणि कॅल्शियम चे उत्तम स्रोत आहेत म्हणून NIN, हैदराबाद आणि VNMKV, परभणी यांनी केलेल्या शिफारसी नुसार ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे अशा महिलांना शेवग्याच्या पानांचे पावडर आहारामध्ये घेण्यासाठी प्रयोग म्हणून देण्यात आले. तसेच इतर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे लोह आणि फॉलिक ऍसिड तसेच कॅल्शियमचे औषधी वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्...

आंबा लागवड शात्रीय पद्तीने कश्या प्रकारे करतात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले

Image
  आंबा लागवड शात्रीय पद्तीने कश्या प्रकारे करतात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले दि ६ जुलै २०२२ रोजी काटकळंबा येथे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, संस्कृति संवर्धन मंडळ अंतर्गत आंबा लागवड या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमांतर्गत डॉ. संतोष चव्हाण यांनी आंबा लागवडीसाठी योग्य प्रकारची जमिनीची निवड करणे तसेच लागवडीपूर्वी मशागत करणे, जमिनीची आखणी करून खड्डे करणे, माती परीक्षण करून खत व्यवस्थापन करणे याच बरोबर कलमांची निवड करताना ति कलमे नोंदणीक्रत रोपवाटीकेतून खरेदी करणे तसेच कलमे हि रोगमुक्त आणि २ ते २.५ फुट वाढलेले असावीत तसेच लागवडीनंतर बागेची काळजी जसे वळण आणि छाटणी करणे, खत व्यवस्थापन आणि अंतर मशागत करणेई. विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणा दरम्यान कलम लागवडीचे शात्रीय पद्तीने लागवड कश्या प्रकारे करतात याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदरील प्रशिक्षणास एकूण २० शेतकरी उपस्थित होते, तसेच पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम प्रकल्प अधिकारी श्री. गंगाधर कांगुलवार व त्यांचे सहकारी उपस्थित होते. #mango #pants #plantation #kvk...