आंबा लागवड शात्रीय पद्तीने कश्या प्रकारे करतात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले

 आंबा लागवड शात्रीय पद्तीने कश्या प्रकारे करतात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले




दि ६ जुलै २०२२ रोजी काटकळंबा येथे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, संस्कृति संवर्धन मंडळ अंतर्गत आंबा लागवड या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमांतर्गत डॉ. संतोष चव्हाण यांनी आंबा लागवडीसाठी योग्य प्रकारची जमिनीची निवड करणे तसेच लागवडीपूर्वी मशागत करणे, जमिनीची आखणी करून खड्डे करणे, माती परीक्षण करून खत व्यवस्थापन करणे याच बरोबर कलमांची निवड करताना ति कलमे नोंदणीक्रत रोपवाटीकेतून खरेदी करणे तसेच कलमे हि रोगमुक्त आणि २ ते २.५ फुट वाढलेले असावीत तसेच लागवडीनंतर बागेची काळजी जसे वळण आणि छाटणी करणे, खत व्यवस्थापन आणि अंतर मशागत करणेई. विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणा दरम्यान कलम लागवडीचे शात्रीय पद्तीने लागवड कश्या प्रकारे करतात याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदरील प्रशिक्षणास एकूण २० शेतकरी उपस्थित होते, तसेच पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम प्रकल्प अधिकारी श्री. गंगाधर कांगुलवार व त्यांचे सहकारी उपस्थित होते. #mango #pants #plantation #kvk​​ #sagroli​​ #nanded​​ #farm​​ #farmer #agriculture​​ #agri #agritech #agricultureworld #AzadiKaAmritMahotsav






Comments

Popular posts from this blog

माझी पोषण परसबाग विकसन मोहीम......

हर घर परसबाग....