हिमोग्लोबिन तसेच कॅल्शियम वाढी साठी शेवगा पानांच्या पावडर चा प्रयोग..
हिमोग्लोबिन तसेच कॅल्शियम वाढी साठी शेवगा पानांच्या पावडर चा प्रयोग..
महिलांमध्ये हिमोग्लोबिन तसेच कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी, हाडांचा ठिसूळपणा, अशक्तपणा, चक्कर येणे अशा अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. यासाठी महिलांमधील हिमोग्लोबिन व रक्तातील इतर घटक तपासून त्यावर आहार मार्गदर्शन आणि उपचार करण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या गृह विज्ञान विभाग, नाबार्ड अंतर्गत पाणलोट विकास प्रकल्प आणि नागरी सहकारी दवाखाना होट्टल यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जुन रोजी रक्त तपासणी शिबिर आयोजित केले गेले. यामध्ये तपासलेल्या रक्तांचे अहवाल आज दिनांक 19 जुलै २०२२ रोजी महिलांना देण्यात आले. शेवग्याची पाने लोह आणि कॅल्शियम चे उत्तम स्रोत आहेत म्हणून NIN, हैदराबाद आणि VNMKV, परभणी यांनी केलेल्या शिफारसी नुसार ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे अशा महिलांना शेवग्याच्या पानांचे पावडर आहारामध्ये घेण्यासाठी प्रयोग म्हणून देण्यात आले. तसेच इतर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे लोह आणि फॉलिक ऍसिड तसेच कॅल्शियमचे औषधी वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप सायनोड यांनी मार्गदर्शन केले. तसेच या प्रसंगी पाणलोट समिती अध्यक्ष श्री. सुर्यवंशी, श्री. आवेज शेख, डॉ. प्रियंका खोले, श्री. रावणगावकर, सौ. रेखा उदगिरे आणि गावच्या सरपंच उपस्थीत होतें. या नंतर दोन महिन्यांनी सदरिल महिलांचे पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यांच्या तब्बेतीमधील फरक पाहण्यात येणार आहे. #hemoglobin #calcium #calciumdeficiency #CalciumSupplement #women #health #drumstick_leaves #moringa #NIN #VNMKV #parbhani #kvk #sagroli #nanded #शेतकरी #शेत #शेती #ClimateChange #हिमोग्लोबिन #कॅल्शियम #Climate_smart_agriculture #शेवगा #पानांच्या #पावडर




Comments
Post a Comment