फळांची बॅगिंग का करावी-पक्ष्याद्वारे फळ खाल्ले जाते व बुरशी, माशा आणि किडे यामुळे पूर्ण फळाचा नाश होतो व फळ वाया जाते जर फळा ला कव्हर (बॅगिंग) केले तर होणारे नुकसान आपण कमी करू शकतो....
फळांची बॅगिंग का करावी-पक्ष्याद्वारे फळ खाल्ले जाते व बुरशी, माशा आणि किडे यामुळे पूर्ण फळाचा नाश होतो व फळ वाया जाते जर फळा ला कव्हर (बॅगिंग) केले तर होणारे नुकसान आपण कमी करू शकतो....
फळ आणि भाज्या यांची बॅगिंग कशा पद्धतीने करतात व त्यासाठी कोणते यंत्र उपयुक्त ठरू शकतात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दि.19 जुलै 2022 रोजी होट्टल येथे संस्कृती संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी अंतर्गत फळांच्या बॅगिंग विषयी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदरील कार्यक्रमांतर्गत डॉ. प्रियंका खोले यांनी फळ आणि भाज्याची बॅगिंग कारणे का जरुरी आहे व बॅगिंग कशा पद्धतीने करावी व त्यासाठी कोणत्या प्रकारच्या यंत्राचा उपयोग करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. बॅगिंग ही कोण कोणत्या फळांची केली जाते- पेरू, आंबा, चिकू, पपई, कारले, भोपळा इत्यादी साठी बॅगिंग केली जाते. बॅगिंग का करावी-पक्ष्याद्वारे फळ खाल्ले जाते त्यामुळे पूर्ण फळाचा नाश होतो व फळ वायाला जाते जर फळा ला कव्हर केले तर तो तोटा आपण कमी करू शकतो. बॅगिंग मुळे फळांचे ऊन पाऊस वाऱ्यापासून संरक्षण होते तसेच खार, बुरशी, माशा आणि किडे यापासून देखील फळाचे संरक्षण होते व आकर्षित व ताजे फळ शेतकऱ्याला ला मिळते. या प्रसंगी पाणलोट समिती अध्यक्ष श्री. सुर्यवंशी, डॉ. माधुरी रेवणवार, श्री. रावणगावकर व त्यांचे सहकारी उपस्थित आणि सौ. रेखा उदगिरे उपस्थीत होतें. #यंत्र #फळ #भाजीपाला #होट्टल #कव्हर #बॅगिंग #tools #fruits #fruit_bagging #fruit_capping #foam #plastic_bag #kvk #sagroli #nanded #farm #farmer #agriculture #agri #agritech #agricultureworld #AzadiKaAmritMahotsav #शेतकरी #शेत #शेती #ClimateChange #Climate_smart_agriculture Priyanka Khole Madhuri Revanwar




Comments
Post a Comment