माझी पोषण परसबाग विकसन मोहीम......

 माझी पोषण परसबाग विकसन मोहीम



संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, जिल्हा परिषद , नांदेड अंतर्गत MSRLM उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी पोषण परसबाग विकसन मोहीम” नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू झाली. दि 7/7/2022, गुरुवार रोजी कोकलेगाव ता. नायगाव जि. नांदेड येथे भाजीपाला पोषण बाग विषयी प्रशिक्षन घेण्यात आले. प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी वर्षभर लागणारा विषमुक्त भाजीपाला आपल्या परसबागेत तसेच शेतातील आखाड्याजवळ लागवड करून रोज लागणारा भाजीपाला स्वतःच्या डोळ्यासमोर पिकवावा, यासाठी सदरील कार्यक्रमात डॉ. माधुरी रेवनवार यांनी आपल्या आहारातील भाजीपाल्याचे महत्व महिलांना पटवून दिले. महिलांचे आजार, सध्याची बदललेली जीवनशैली, घराघरात पोहचलेले आजार जसे कर्करोग (कॅन्सर) मधुमेह, हृदयविकार इत्यादि या आजारापासून दूर राहायचे असेल तर आपल्याला विषमुक्त अन्नाशिवाय पर्याय नाही. या प्रशिक्षणात शास्त्रशुद्ध पद्धतीने कमी जागेत 38 प्रकारचा भाजीपाला पिकवण्याचे तंत्र .
"गंगामा पोषण परसबाग" तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या प्रशिक्षणाला कोकलेगव येथील महिला व शाळेतील मुले आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राकडून ३८ प्रकारचा पारंपारिक भाजीपाला बियाणे कीट महिलांना देण्यात आले.
या अंतर्गत आज दुसरा दिवस - दिनांक 8 जुलै 2022 रोजी “पोषण बाग महत्व, विविध प्रकार आणि व्यवस्थापन” या विषयावर नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बचत गटांच्या महिलांसाठी ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेसाठी उमेद अभियानाचे जिल्हा आणि सर्व तालुका व्यवस्थापक तसेच सर्व अधिकारी वर्ग, बचत गटांच्या महिला असे एकूण २००० हून अधिक संख्येने उपस्थित होते. #पोषण #परसबाग🌱 #परसबाग_लागवड #परसबाग🔥 #उमेद #अभियान #भाजीपाला🥦 #seedlingsale #kvk​​ #sagroli​​ #nanded​​ #farm​​ #farmer #AzadiKaAmritMahotsav #गांगमा_मंडळ #प्रशिक्षण #health #diet #आहार #पोषण #हर_घर #पोषणबाग #agriculture​​ #agri #agricultureworld #msrlm #UMED #zp_nanded #जिल्हा_परिषद_नांदेड #बियाणे









Comments

Popular posts from this blog

आंबा लागवड शात्रीय पद्तीने कश्या प्रकारे करतात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले

हर घर परसबाग....