Posts

सोयाबीन उगवण तक्रारीबाबत मुखेड तालुक्यात तालुका तक्रार निवारण समितीची भेट...

Image
  सोयाबीन उगवण तक्रारीबाबत मुखेड तालुक्यात तालुका तक्रार निवारण समितीची भेट... खरीप हंगाम 2022 मान्सूनची उशिरा सुरुवात झाली. मुखेड तालुक्यातील 26 शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवण व्यवस्थित न झाल्याच्या लेखी तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुखेड येथे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी मुख्यत्वेकरून सुगाव, राजुरा, मंग्याळ, बाराळी, हसनाळ, करना, हीबट, सावरगाव व बिल्लाळी या गावातील होत्या. प्राप्त तक्रारीवरून तालुका तक्रार निवारण समिती ज्यात तालुका कृषी अधिकारी श्री बिराडे, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री .देशमुख व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व संबंधित गावातील कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्राची पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणी मध्ये उगवण क्षमता 10% ते 50 % पर्यंत आढळून आली. कमी झालेली उगवन ही सदोष बियाण्यांमुळे असल्याचे निदर्शनास आले. तक्रार दिलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष निदर्शनास आलेल्या बाबीनुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अहवाल देण्याचे काम चालू आहे. #soyabean #germination #problematic #seeds #crop #agri_dept #kvk ​​ #sagroli ​​ #nanded ​​ #farm ​​ #...

माझी पोषण परसबाग विकसन मोहीम......

Image
  माझी पोषण परसबाग विकसन मोहीम संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, जिल्हा परिषद , नांदेड अंतर्गत MSRLM उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी पोषण परसबाग विकसन मोहीम” नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू झाली. दि 7/7/2022, गुरुवार रोजी कोकलेगाव ता. नायगाव जि. नांदेड येथे भाजीपाला पोषण बाग विषयी प्रशिक्षन घेण्यात आले. प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी वर्षभर लागणारा विषमुक्त भाजीपाला आपल्या परसबागेत तसेच शेतातील आखाड्याजवळ लागवड करून रोज लागणारा भाजीपाला स्वतःच्या डोळ्यासमोर पिकवावा, यासाठी सदरील कार्यक्रमात डॉ. माधुरी रेवनवार यांनी आपल्या आहारातील भाजीपाल्याचे महत्व महिलांना पटवून दिले. महिलांचे आजार, सध्याची बदललेली जीवनशैली, घराघरात पोहचलेले आजार जसे कर्करोग (कॅन्सर) मधुमेह, हृदयविकार इत्यादि या आजारापासून दूर राहायचे असेल तर आपल्याला विषमुक्त अन्नाशिवाय पर्याय नाही. या प्रशिक्षणात शास्त्रशुद्ध पद्धतीने कमी जागेत 38 प्रकारचा भाजीपाला पिकवण्याचे तंत्र . "गंगामा पोषण परसबाग" तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या प...

हर घर परसबाग....

Image
  हर घर परसबाग पोषणा अभावी महिलांमध्ये रक्तक्षय, हाडांचे आजार बळावतात. तसेच रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अती वापरामुळे अनेक गंभीर आजार वाढत आहेत. कुटुंबाचे आरोग्य जपायचे असेल तर शेंद्रिय भाजीपाल्याचे रोजच्या आहारात सेवन करणे अनिवार्य आहे. या साठी प्रत्येक घरी पोषण बाग तयार केल्यास भाजीपाल्याची कमतरता भासणार नाही, खर्च वाचेल आणि ताजा पौष्टिक भाजीपाला रोज मिळेल. म्हणूनच यासाठीच भाजीपाल्यांचे आहारातील महत्त्व आणि त्यासाठी परसबाग लागवड या विषयावर आज दि. 6 जुलै रोजी बावलगाव ता. बिलोली येथे कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. या प्रशिक्षण दरम्यान उपस्थितांना गांगमा मंडळची आखणी करून दाखवली. पारंपरिक भाजीपाला बियांनांचे महत्त्व समजावून सांगून बियाणे देण्यात आले. या कार्यक्रमासाठी शेंद्रीय शेतीवर कार्य करणारे ॲड. संगारेड्डीकर देखील उपस्थित होते. #पोषण #परसबाग #परसबाग_लागवड #परसबाग #उमेद #अभियान #भाजीपाला #seedlingsale #kvk ​​ #sagroli ​​ #nanded ​​ #farm ​​ #farmer #AzadiKaAmritMahotsav #गांगमा_मंडळ #प्रशिक्षण #health #diet #आहार #पोषण #...