सोयाबीन उगवण तक्रारीबाबत मुखेड तालुक्यात तालुका तक्रार निवारण समितीची भेट...

 सोयाबीन उगवण तक्रारीबाबत मुखेड तालुक्यात तालुका तक्रार निवारण समितीची भेट...


खरीप हंगाम 2022 मान्सूनची उशिरा सुरुवात झाली. मुखेड तालुक्यातील 26 शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवण व्यवस्थित न झाल्याच्या लेखी तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुखेड येथे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी मुख्यत्वेकरून सुगाव, राजुरा, मंग्याळ, बाराळी, हसनाळ, करना, हीबट, सावरगाव व बिल्लाळी या गावातील होत्या. प्राप्त तक्रारीवरून तालुका तक्रार निवारण समिती ज्यात तालुका कृषी अधिकारी श्री बिराडे, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री .देशमुख व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व संबंधित गावातील कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्राची पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणी मध्ये उगवण क्षमता 10% ते 50 % पर्यंत आढळून आली. कमी झालेली उगवन ही सदोष बियाण्यांमुळे असल्याचे निदर्शनास आले. तक्रार दिलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष निदर्शनास आलेल्या बाबीनुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अहवाल देण्याचे काम चालू आहे. #soyabean #germination #problematic #seeds #crop #agri_dept #kvk​​ #sagroli​​ #nanded​​ #farm​​ #farmer #agriculture​​ #agri #agritech #agricultureworld #AzadiKaAmritMahotsav



Comments

Popular posts from this blog

माझी पोषण परसबाग विकसन मोहीम......

फळांची बॅगिंग का करावी-पक्ष्याद्वारे फळ खाल्ले जाते व बुरशी, माशा आणि किडे यामुळे पूर्ण फळाचा नाश होतो व फळ वाया जाते जर फळा ला कव्हर (बॅगिंग) केले तर होणारे नुकसान आपण कमी करू शकतो....

आंबा लागवड शात्रीय पद्तीने कश्या प्रकारे करतात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले