हर घर परसबाग....

 हर घर परसबाग


पोषणा अभावी महिलांमध्ये रक्तक्षय, हाडांचे आजार बळावतात. तसेच रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अती वापरामुळे अनेक गंभीर आजार वाढत आहेत. कुटुंबाचे आरोग्य जपायचे असेल तर शेंद्रिय भाजीपाल्याचे रोजच्या आहारात सेवन करणे अनिवार्य आहे. या साठी प्रत्येक घरी पोषण बाग तयार केल्यास भाजीपाल्याची कमतरता भासणार नाही, खर्च वाचेल आणि ताजा पौष्टिक भाजीपाला रोज मिळेल. म्हणूनच यासाठीच भाजीपाल्यांचे आहारातील महत्त्व आणि त्यासाठी परसबाग लागवड या विषयावर आज दि. 6 जुलै रोजी बावलगाव ता. बिलोली येथे कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. या प्रशिक्षण दरम्यान उपस्थितांना गांगमा मंडळची आखणी करून दाखवली. पारंपरिक भाजीपाला बियांनांचे महत्त्व समजावून सांगून बियाणे देण्यात आले. या कार्यक्रमासाठी शेंद्रीय शेतीवर कार्य करणारे ॲड. संगारेड्डीकर देखील उपस्थित होते. #पोषण #परसबाग🌱 #परसबाग_लागवड #परसबाग🔥 #उमेद #अभियान #भाजीपाला🥦 #seedlingsale #kvk​​ #sagroli​​ #nanded​​ #farm​​ #farmer #AzadiKaAmritMahotsav #गांगमा_मंडळ #प्रशिक्षण #health #diet #आहार #पोषण #हर_घर #पोषणबाग








Comments

Popular posts from this blog

माझी पोषण परसबाग विकसन मोहीम......

आंबा लागवड शात्रीय पद्तीने कश्या प्रकारे करतात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले